JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / धारावीत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण, सॅनिटाइझ करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण

धारावीत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण, सॅनिटाइझ करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण

52 वर्षांच्या या कर्मचाऱ्याची कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

जाहिरात

याशिवाय इंदौरमध्ये गुरुवारी सकाळी कोरोना संक्रमित असलेल्या 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 एप्रिल : देशभरात कोरोना अशरक्ष: थैमान घातल आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 338 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान धारवीमध्ये काम सॅनिटाइझचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 52 वर्षांच्या या कर्मचाऱ्याची कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी वरळीतील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतील बुधवारी 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

धारावी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर बालिगा नगर येथील 300 फ्लॅट्स आणि 90 दुकानं सील करण्यात आली आहे. याशिवाय हाय रिस्कमधील नागरिकांना क्वारंटाइनचा शिक्का लावण्यात आला आहे. या भागातील आजारी नागरिकांची तपासणी केली जात आहे. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानी नाही. तर खाण्याचे पदार्थ आणि रेशन बीएमसीकडून पुरवले जात आहे. जोपर्यंत हाय रिस्क असणाऱ्यांच्या चाचणीचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले आहे. बातमी अपडेट होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या