JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai : मुंबईच्या मध्यवर्ती भागात दूषित पाणीपुरवठा, नागरिकांनी दिला गंभीर इशारा, Video

Mumbai : मुंबईच्या मध्यवर्ती भागात दूषित पाणीपुरवठा, नागरिकांनी दिला गंभीर इशारा, Video

वडाळा पूर्व विभागात वर्षभरापासून रोज तासभर गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 30 डिसेंबर : मुंबई तील वडाळा पूर्व परिसरातील कोरबा मिठागर, नाना भाईवाडी, रामगल्ली, आदर्श रमाई नगर, महात्मा फुले वाडी, मानूरवाडी, लक्ष्मणवाडी, काळेवाडी विभागांत वर्षभरापासून रोज तासभर गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. काही विभागात तर रात्री दोन वाजता पाणी येते. तेही गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दूषित पाण्याची समस्या सोडवण्याबाबत महापालिका एफ नॉर्थ विभागाकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. मुंबईतील वडाळा विभागाला सध्‍या पाण्याच्या समस्येने ग्रासले आहे. महापालिका एफ नॉर्थ विभागाच्या वतीने चक्क रात्री दोन वाजता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सुरुवातीला एक तास गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांना ते रोजच्या उपयोगात आणता येत नाही. त्यामुळे रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. तर दिवसभर नोकरी आणि मध्यरात्री पाणी भरण्यासाठी जागरण असा प्रकार तब्बल वर्षभर सुरू असल्याने नोकरदार वर्गाला कामावर जाण्यासाठी उशीर होतो.

सर्वाधिक गैरसोय महिलांची  सर्वाधिक गैरसोय महिलांची होत आहे. रात्री दोननंतर नळाला पाणी येत असल्यामुळे ते भरेपर्यंत सकाळचे पाच वाजतात. झोपायचे आणि उठायचे केव्हा, असा प्रश्न त्या उपस्थित करत आहेत. पालिकेने पाणी सोडण्याची वेळ बदलल्याने कोरबा, मिठागरमधील नानाभाई वाडी, रामगल्ली, आर्दश रमाई नगर, महात्मा फुले वाडी इत्यादी विभागांतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर दूर करावी  रात्री विभागात दोन वाजता पाणी येतं साडे चार वाजता बंद होत. एक तास किंवा त्यापेक्षा जास्तवेळ सुरुवातीला पाणी खराब येत. रात्री येणाऱ्या पाण्यामुळे रात्रंभर जागावं लागतं. सकाळी घरातील व्यक्ती कामावर जातात. मुलं शाळेत जातात. आम्हाला महिलांना रात्री सुद्धा आराम मिळत नाही आणि सकाळी सुद्धा मिळत नाही. कधी कधी रात्रभर पाणी खराब येतं. अश्यावेळी पिण्यायोग्य पाणी मिळालं तर ते उकळवून पिल्या जाते नाहीतर नाईलाजाने बाहेरून पाणी विकत आणावे लागते. त्यामुळे आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी नागरिक गीता यादव यांनी प्रशासनकडे केली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घ्या बाप्पाचं दर्शन! सिद्धीविनायक मंदिर लवकर होणार सुरू आक्रोश मोर्चा काढू असा पवित्रा स्थानिकांनी घेतला दूषित पाण्याची समस्या सोडवण्याबाबत महापालिका एफ नॉर्थ विभागाकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढू असा पवित्रा स्थानिकांनी घेतला असल्याचं स्थानिक रहिवाशी समाजसेवक भगवान कदम यांनी सांगितलं. नागरिकांच्या समस्येवर लवकरात लवकर आम्ही तोडगा काढू इथल्या रहिवाशांच्या आम्हाला लेखी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करून आम्ही आमचे काही अधिकारी तिकडे पाठवले होते. या अधिकाऱ्यांनी तिकडचे पाण्याचे सॅम्पल गोळा केलेले आहेत. या सॅम्पलचे परीक्षण करून त्याचा पुढचा रिपोर्ट तयार केला जाईल आणि या नागरिकांच्या समस्येवर लवकरात लवकर आम्ही तोडगा काढू राहता राहिला त्यांचा दुसरा प्रश्न पाण्याच्या प्रेशर बाबतचा त्यावर देखील तोडगा काढण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. याचा लेखी रिपोर्ट आम्ही लवकरच सादर करू, असं सहायक आयुक्त एफ नॉर्थ विभाग गजानन बेल्हाळे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या