JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी, घरी परतले, भावाच्या मदतीला येणार का धावून?

राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी, घरी परतले, भावाच्या मदतीला येणार का धावून?

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे (mns leader raj thackeray) यांच्या पायाला दुखापत (hip bone) झाली होती. दरम्यान याासाठी त्यांनी नियोजित दौरेही रद्द केले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे (mns leader raj thackeray) यांच्या पायाला दुखापत (hip bone) झाली होती. दरम्यान याासाठी त्यांनी नियोजित दौरेही रद्द केले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया (Hip bone surgery) यशस्वी करण्यात झाली आहे. दीड तास ही शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान ती यशस्वी झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली, ते आता रुग्णालयातून डिस्चार्ज (Raj Thackeray discharged from hospital) मिळाले असल्याचेही त्यांनी ट्वीटरवर (twitter) माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीटरवर अशी माहिती दिली कि, ‘‘आपल्या आर्शिवादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली आहे. काही वेळापूर्वीच, रुग्णालातून बाहेर पडून मी घरी पोहचलो आहे. आपले आर्शिवाद आणि प्रेम असेच कायम राहो! आपला नम्र राज ठाकरे.’’ दरम्यान त्यांनी पोस्ट करण्यासाठी भगवा रंग निवडल्याने हा ही चर्चेचा विषय बनला आहे. अशा आशयाचे ट्विट शेअर करत राज ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र, आमदारांची संख्याच सह्यानिशी दाखवली

संबंधित बातम्या

जाहिरात

राज ठाकरे 18 जूनला मुंबईतल्या लिलावती रुग्णलायत दाखल झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. याआधी एक जूनला शस्त्रक्रिया होणार होती. पण राज ठाकरे यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

टेनिस खेळताना पायाला जबर दुखापत

टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढल्याने मे महिन्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर तब्येतीच्या कारणाने त्यांनी नियोजित अयोध्या दौराही त्यांनी थांबवल्याचे जाहीर केले होते.

जाहिरात

हे ही वाचा :  7 गाड्या; 9 कोटींची घरं आणि बरंच काही..! किती आहे एकनाथ शिंदेंची नेमकी संपत्ती?

राज ठाकरे भावाच्या मदतीला येणार का?

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेसोबत बंडखोरी करत शिवसेनेत मोठी खिंडार पाडण्याचे काम केले जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीत राज ठाकरे यांची तब्बेत ठिक नसल्याने त्यांनी कुठेही वाच्यता केली नव्हती. ते आता घरी आल्याने काही बोलणार का शिवसेना आज धोक्यात असल्याने त्यांच्या मदतीला राज ठाकरे जाणार का यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या