JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BIG NEWS:  मुंबईत आता जुन्या रिक्षांना बंदी, राज्यात 4 टप्प्यात हटविणार त्या सर्व गाड्या

BIG NEWS:  मुंबईत आता जुन्या रिक्षांना बंदी, राज्यात 4 टप्प्यात हटविणार त्या सर्व गाड्या

1 ऑगस्ट 2021ला ज्या रिक्षाचं वय 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा रिक्षांना मुंबईसह इतर MMR रिजन मध्ये धावता येणार नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 05 ऑक्टोबर: मुंबईत वाहतुकीला (Mumbai Traffic) शिस्त लागावी आणि प्रदुषणाला (Pollution ) आळा बसावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या सर्व रिक्षांवर बंदी घालण्यात आली आहे. या रिक्षा रस्त्यांवर आता धावू शकणार नाहीत. राज्य परिवहन प्राधिकारणाने हा निर्णय जाहीर केला आहे. 1 ऑगस्ट 2021ला ज्या रिक्षाचं वय 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा रिक्षांना मुंबईसह इतर MMR रिजन मध्ये धावता येणार नाही. तर एमएमआर रिजन व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर भागांत 4 टप्प्यात जुन्या रिक्षा वाहतुकीतून बाद करण्यात येणार आहेत. खटूआ समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी आहे रिक्षांची वयोमर्यादा 1/08/21- 20वर्षे 1/08/22- 18 वर्षे 1/08/23- 16वर्षे 1/08/24- 15 वर्षे खासकरून मुंबईमध्ये रिक्षांची संख्या ही प्रचंड आहे. त्यात जुन्या रिक्षांंचं प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रदुषण आणि अपघाताचं प्रमाणही वाढतं. या संदर्भात अनेक तज्ज्ञ समित्यांनी आपले अहवाल दिले होते. त्याच बरोबर मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असल्याने जागतिक मानकांमध्येही या संदर्भात मुंबई पिछाडीवर होती. या सर्व गोष्टींमुळे वाहतुकीला शिस्तही लागत नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी नव्या गाईड लाईन्स जारी केल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुंबई सोबतच राज्यातूनही जुन्या गाड्या रस्त्यांवरून बाद करण्यात येणार आहेत. या जुन्या गाड्यांमधून सर्वात जास्त प्रदुषण होत असतं. त्यामुळे वातावरणावरही परिणाम होत असतो. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात रिक्षा चालकांमध्येही जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. तसेच त्यांना नव्या गाड्या घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचाही सरकार विचार करत आहे. या निर्णयामुळे अनेक रिक्षाचालकांना आता नव्या गाडीसाठी नियोजन करावं लागणार आहे.  सरकारने कार उत्पादकांनाही सूचना केल्या असून नव्या गाड्या या जागतिक मानकानुसार पाहिजेत अशी सक्ती केलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या