JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...अन्यथा भरावा लागेल दंड; सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर गडकरींचा मोठा निर्णय

...अन्यथा भरावा लागेल दंड; सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर गडकरींचा मोठा निर्णय

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

जाहिरात

Nitin Gadkari

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 सप्टेंबर : सध्या रस्ते अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच NCRBने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, 2021 या वर्षात तब्बल 1.6 लाख भारतीयांनी आपला जीव रस्ते अपघातात गमावला होता. महाराष्ट्रातले मोठे नेते विनायक मेटे यांचंदेखील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं. सात एअरबॅग्ज असलेल्या सुरक्षित मर्सिडीजमध्ये असूनही केवळ सीटबेल्ट न लावल्यामुळे मिस्त्री यांचा मृत्यू झाला, असं समोर आलं आहे. यामुळेच आता केंद्र सरकार गाडीमधल्या सीटबेल्ट संबंधित मोठा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

कारच्या पहिल्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं अनिवार्य आहेच. मात्र कारच्या मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक असेल. विशेष म्हणजे सीट बेल्ट न लावणाऱ्यांविरोधात चलान कापलं जाईल. भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतांश गाड्यांमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींनी सीटबेल्ट न लावल्यास वॉर्निंग देण्याची सुविधा आहे. कित्येक जण ही वॉर्निंग बंद करण्यासाठी सीटबेल्ट क्लिप लावतात. त्यामुळे सीटबेल्ट न लावताही विनाव्यत्यय गाडी चालवता येते. देशातल्या काही गाड्यांमध्ये तर अशी सोय आहे, की सीटबेल्ट लावला नसल्यास त्या पुढेच जात नाहीत; मात्र मागे बसणाऱ्या व्यक्तींनी सीटबेल्ट न लावल्यास अशा प्रकारचा कोणताही अलार्म किंवा वॉर्निंग देणारी सिस्टीम उपलब्ध नाही. यामुळेच याबद्दलच्या नियमात बदल करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या