JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / जगात भारी! मुंबई दौऱ्यात ब्रिटीश उच्चायुक्तालाही 'वडापाव'ने घातली भुरळ, गणपती बाप्पाचंही घेतलं दर्शन, पाहा PHOTOS

जगात भारी! मुंबई दौऱ्यात ब्रिटीश उच्चायुक्तालाही 'वडापाव'ने घातली भुरळ, गणपती बाप्पाचंही घेतलं दर्शन, पाहा PHOTOS

‘वडापाव’ शिवाय महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अपूर्णच म्हणावी लागेल. वडापाव हा प्रत्येक खवय्याला आपल्या मोहात पाडतो. मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या एका ब्रिटीश उच्चायुक्तालाही वडापावनं क्लिन बोल्ड केलं आहे.

0107

मुंबई: 'वडापाव' शिवाय महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अपूर्णच म्हणावी लागेल. वडापाव हा प्रत्येक खवय्याला आपल्या मोहात पाडतो. मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या एका ब्रिटीश उच्चायुक्तालाही वडापावनं क्लिन बोल्ड केलं आहे.

जाहिरात
0207

मुंबई दौऱ्यावर आलेले ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला आहे.

जाहिरात
0307

अगदी मुंबईच्या डब्बेवाल्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांचीदेखील त्यांनी भेट घेतली आहे.

जाहिरात
0407

या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, व्यवसाय, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण याचा जवळून आढावा घेतला आहे.

जाहिरात
0507

यावेळी त्यांनी गणपती बाप्पाची निर्मिती करणाऱ्या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपलंसं करत गणरायाचं दर्शन देखील घेतलं आहे.

जाहिरात
0607

यावेळी त्यांना महाराष्ट्राची ओळख असणारा वडापाव प्रचंड आवडला आहे. याबाबतचे फोटो आणि व्हिडीओज शेअर करत त्यांनी वडापाव बद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

जाहिरात
0707

गेट वे ऑफ इंडिया परिसरात त्यांनी वडापाववर मनसोक्त ताव मारला. त्याचे फोटो शेअर करीत त्यांनी वडापाव विषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे मराठीत ''लई भारी'' अशी दाद देत त्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या