JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू

Mumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू

One dies as wall collapsed in Mumbai: मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. याच दरम्यान भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे.

जाहिरात

Representative Image

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून: मुंबई, ठाणे, वसई विरार, भिवंडी परिसरात आज दुपारपासूनच जोरदार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसात मुंबईतील पूर्व उपनगरात असलेल्या मुलुंड परिसरात भिंत कोसळून (Wall collapsed in Mulund) दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (One dies in incident) झाला आहे. मुलुंड पश्चिम (Mulund West) परिसरातील कलपादेवी पाडा परिसरातील वायदे चाळीत ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर असलेल्या कलपादेवी पाडा येथील वायडे चाळीत एक भिंत कोसळली. या दुर्घटनेत 35 वर्षीय दिलीप वर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संबंधित बातम्या

मुंबईसह कोकणात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात 18 आणि 19 तारखेला मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसईत 17 जून रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मांडवी - 47 मिमी आगाशी - 110 मिमी निर्मल - 93 मिमी विरार - 161 मिमी माणिकपूर - 129 मिमी वसई - 125 मिमी पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा  18 जून कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या