मुंबई, 21 जुलै : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला होता. त्यानंतर आता दोन दिवसांनी मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात या पावसानं पाणी साचलंय. त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला असून अनेक भागात संथगतीनं वाहतूक सुरू आहे. कोणत्या भागात साचलं पाणी? मुंबईतील किंग्ज सर्कल, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं आहे. अंधेरी सब वेमध्ये पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अंधेरी सबवे खाली 2 ते 3 फूट पाणी साचल्याने प्रवाशांची कोंडी झाली असून परिणामी वाहतूक खोळंबली आहे.
महापालिकेने पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत होत आहे. मात्र तरी देखील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. इर्शाळवाडीत सलग दुसऱ्यादिवशी रेस्क्यू ऑपरेशन, आताची काय आहे स्थिती पाहा PHOTO सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘तुंबई’ झाली आहे. हवामान खात्याने ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. .