JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai: चक्क पोलिसांनीच साजरा केला गुन्हेगाराचा वाढदिवस, केक कापतानाचा VIDEO VIRAL

Mumbai: चक्क पोलिसांनीच साजरा केला गुन्हेगाराचा वाढदिवस, केक कापतानाचा VIDEO VIRAL

मुंबई पोलिसांनीच चक्क एका गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : मुंबई पोलीस (Mumbai Police) हे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अग्रेसर असतात. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ हालचाल करुन आरोपींना बेड्या ठोकतात. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नेहमीच कौतुकंही केलं जातं. मात्र, आता मुंबई पोलिसांचा असा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे ज्याने सर्वांनाच चकीत केले आहे. होय झालं असं की, मुंबई पोलिसांनी चक्क एका गुंडाचा वाढदिवस (Criminal birthday celebration) साजरा केला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दानिश सय्यद याच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. दानिश हा मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहतो. गेल्या आठवज्यात त्याचा वाढदिवस होता आणि तो साजरा करण्यासाठी मुंबईतील जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी चक्क त्याच्या घरी गेल्याची माहिती समोर आली आहे. …आणि छगन भुजबळ थेट पोहोचले देवेंद्र फडणवीसांच्या घरी मिळालेल्या माहितीनुसार जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे अधिकारी हे आरोपी दानिशच्या घरी दाखल झाले आणि त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत पोलीस अधिकारी आरोपीला केक भरतवाना सुद्धा दिसत आहेत. किरीट सोमय्यांची टीका

संबंधित बातम्या

गुन्हेगाराच्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, ठाकरे सरकारचा राज्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करतात. क्राईम ब्रांच वसुलीचे काम करतात, मुंबई पोलीस मनसुख हीरणच्या हत्येची सुपारी घेतात, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त एकमेकांवर हप्ता घेण्याचा आरोप करतात. सचिन वाझे महिन्याला 100 कोटीची वसुली आणि वाटप करतात. आरोपी दानिश याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारे बाळगणे, घातक हत्यारांसह दंगा करणे यासारखे अनेक गुन्हे नोंद आहेत. चक्क गुन्हेगारांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येच पोलीस अधिकारी सहभागी होत असतील तर गुन्हेगारीला आळा कसा बसेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या