JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / संतापजनक! मुंबईत कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक

संतापजनक! मुंबईत कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक

Female Corona Positive Patient molested in Mumbai: एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 एप्रिल : मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन (Quarantine) असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाड (Covid positive woman molested) केल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने कारवाई करत मेडिकल कोऑर्डिनेटर असलेल्या आरोपीला बेड्या (Medical Co-ordinator arrested) ठोकल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मुंबईतील अंधेरी (Andheri, Mumbai) परिसरात घडली आहे. पीडित महिला ही पनवेलची निवासी असून ती अंधेरीतील एका हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होती. यावेळी तिच्यासोबत मेडिकल कोओर्डिनेटर असलेल्या व्यक्तीने छेडछाड केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एकटीला पाहून आरोपीने गैरफायदा घेत मला अनेकदा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत छेड काढली. या प्रकरणी अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी मेडिकल को-ऑर्डिनेटर असलेल्या सरफराज मोहम्मद खान या आरोपीला अटक केली आहे. हे पण वाचा:  कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानं संतप्त मुलाची डॉक्टरांना मारहाण; गुन्हा दाखल आरोपी सरफराज मोहम्मद खान याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पीडित महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट 7 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता आणि तेव्हापासून ही महिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होती. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये अनेक हॉटेल्स, शासनाच्या इमारतींचाही समावेश आहे. अशाच प्रकारे अंधेरीतील या हॉटेलमध्येही क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे आणि कोरोना बाधित रुग्णांना तेथे ठेवण्यात येते. मात्र, क्वारंटाईन असलेल्या बाधित महिलेसोबत असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध भागांत अशा प्रकारे कोरोना बाधित महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या