मुंबई, 13 ऑगस्ट : चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीमध्ये घर पडलं असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. ठक्कर बाप्पा कॉलनीमध्ये हनुमान चाळ, हनुमान गल्ली इथे हे घर पडलं असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये 7 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटमळ्याचा काम सुरू असताना हा अपघात झाला आहे. घर पडल्याची माहिती मिळताच बचाव कार्य आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घराचा मलबा बाजूला काढण्याच काम सध्या सुरू असून 4 जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.