JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आरोपी महिलेचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला, पडली रेल्वे ट्रॅकवर; पुढे झालं असं की...

आरोपी महिलेचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला, पडली रेल्वे ट्रॅकवर; पुढे झालं असं की...

दादर रेल्वे स्टेशन (Dadar Railway Station)वरील एक सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage)समोर आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे: दादर रेल्वे स्टेशन (Dadar Railway Station)वरील एक सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage)समोर आलं आहे. एक महिला आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यानं जीवाची बाजी लावत या महिलेचा जीव वाचवला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर क्रमांक 4 वरील ही घटना आहे.

संबंधित बातम्या

नेमकी घटना काय? दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आरोपी असलेल्या एका महिलेला पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी महिलेनं समोरून येणारी लोकल ट्रेन पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळण्याचा प्रयत्न करताना तिनं पोलिसांचा हात झटकून प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा हा प्रयत्न फसला. अचानक उडी मारल्यानं तिचा तोल गेला आणि ती रेल्वे ट्रॅकवर पडली. त्याचवेळी सतर्क असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी कमालीचं शौर्य दाखवून सावधगिरीनं ट्रेन येण्यापूर्वीच महिला आरोपीला ट्रॅकवरून बाजूला केलं. हेही वाचा-  चिपळूणकरांची चिंता वाढवणारी बातमी, ग्रामीण भाग ठरतोय हॉटस्पॉट स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. पळून जाणारी महिला ही एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचं समजतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या