JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / कुणी आवरायचं या मुंबईकरांना! उच्चांकी रुग्णसंख्येनंतर दुसऱ्या दिवशी बाजारात ही आहे स्थिती

कुणी आवरायचं या मुंबईकरांना! उच्चांकी रुग्णसंख्येनंतर दुसऱ्या दिवशी बाजारात ही आहे स्थिती

दादर मार्केटमधील (dadar market crowded) अशी परिस्थिती पाहून मुंबईत (mumbai coronavirus) आजपासूनच कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

0106

राज्यात गुरुवारी एकाच दिवसात कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला. गुरुवारी नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकलं. गुरुवारी 24 तासांत राज्यात 25833 नवे रुग्ण सापडले. याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी मुंबईतील काळजात धस्सं करणारं असं दृश्यं समोर आलं आहे.

जाहिरात
0206

दादर मार्केटमधील हे दृश्यं. जिथं शुक्रवारी फूल आणि भाजी मार्केट गजबजून भरलेलं दिसलं. विशेष म्हणजे इथं नागरिकांनी कोरोना नियम अक्षरश: धाब्यावरच बसवले. ना कुणाच्या चेहऱ्यावर मास्क दिसतो आहे, ना कुणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतं आहे.

जाहिरात
0306

मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असतानाही दादरमध्ये असंच दृश्यं दिसतं आहे. सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  बीएमसीने दादर मार्केट तात्पुरत्या स्वरूपात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. 

जाहिरात
0406

शहरात गुरुवारी दिवसभरात उच्चांकी 2,877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा सात ऑक्टोबरच्या उच्चांकी 2,848 संख्येपेक्षा जास्त आहे. 

जाहिरात
0506

दरम्यान मुंबईत सोमवारपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली होती. मात्र, आता आजपासूनच हे निर्बंध लागू होण्याची शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे. CNN-News18 ला दिली. 

जाहिरात
0606

लोकांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवत असल्याचं महापौरांनी म्हटलं आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की कोणालाही लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही. मात्र, लॉकडाऊनची गरज पडणार की नाही हे पूर्णपणे लोकांवर अवलंबून आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या