JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / मुंबईकरांना मोठा दिलासा! शहरातील कोरोना परिस्थितीचा 'पॉझिटिव्ह' आकडा

मुंबईकरांना मोठा दिलासा! शहरातील कोरोना परिस्थितीचा 'पॉझिटिव्ह' आकडा

Mumbai fight back : मुंबई कोरोनाव्हायरसविरोधात पुन्हा लढा देताना दिसते आहे.

0106

कोरोनाविरोधी दुसऱ्या लाटेवरही नियंत्रण मिळवण्याचे मुंबईचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. गेले काही दिवस मुंबईतील सर्वाधिक रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. पण आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात
0206

मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट लक्षणीयरित्या घसरला आहे. मुंबईत मागच्या काही दिवसात रुग्ण पॉझिटिव्ही दर हा 10 टक्क्यांच्या आसपास होता. पण आता तो यापेक्षाही कमी झाला आहे.

जाहिरात
0306

पॉझिटिव्हीटी दर म्हणजे एकूण चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण. सध्या मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट हा जवळपास पावणेआठ टक्क्यांवर आला आहे.

जाहिरात
0406

मागील 24 तासांत 33 हजार 400 चाचण्या झाल्या. त्यापैकी  2633 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. याचा अर्थ मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर हा 7.8% आहे.

जाहिरात
0506

मुंबईत आतापर्यंत मागच्या सव्वा वर्षाच्या काळात 56 लाख 44 हजार 402 इतक्या चाचण्या झाल्या. त्यापैकी 6 लाख 71 हजार 394 इतके रुग्ण कोरोना बाधित आढळलेत.

जाहिरात
0606

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या