मुंबई, 29 जून : आज राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह सुरू असताना मुंबईतून अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बोरीवलीतील एका कुटुंबाने आपलं दीड महिन्याचं बाळ गमावलं. पोटमाळा कोसळल्यानं झालेल्या अपघातात या तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला आहे. बाळ झोपेत असताना अचानक पोटमाळा कोसळला आणि या दुर्घटनेत दीड महिन्यांच्या आर्यन पालचा मृत्यू झाला आहे. बोरीवलीच्या गणपत पाटीलनगर येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणात MHB कॉलनीत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. बातमी अपडेट होत आहे.