रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आहे.
कोरोना व्हायरसने मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र सगळ्यांना चिंता होती ती धारावीची मात्र महापालिकेने राबविलेल्या ‘मिशन धारावी’चे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत.
‘मिशन धारावी’मुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं असून रविवारी फक्त 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.
मिशन धारावीमध्ये धारावीतल्या हजारो लोकांची टेस्ट करण्यात आली. आणि लक्षणे आढळलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आलं.
रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.