JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर

मालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर

Malad Building Collapsed: मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून: मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर Heavy rain in Mumbai) मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Malad Building Collapsed) न्यू कलेक्टर (New Collector compound) कंपाऊंटमधील चार इमारतीचा काही भाग कोसळला. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुर्देवानं मृतांमध्ये 6 लहांना मुलांचा समावेश असून या लहानग्यांचं वय 10 वर्षाच्या आत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास 16 जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. ज्यात तीन लहान मुलं, तीन महिला आणि 10 पुरुषांचा समावेश होता. दुर्घटनेतून रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारी म्हणून इमारतही रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या