मुंबई, 08 जानेवारी : भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. इंग्रजी नवं वर्षाच्या सुरुवातीचा सण म्हणजे मकरसंक्रांत. 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला मकरसंक्रांत असते. या काळात सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो. त्यामुळे मकरसंक्रांत साजरी करण्यात येते. मकरसंक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. या निमित्ताने महिला हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. या सणाला काळ्या रंगाचेच महत्त्व असल्याने संक्रांतीसाठी आवर्जून काळी साडी खरेदी केली जाते. तुमच्याकडेही काळ्या रंगाची साडी नसेल आणि संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही काळ्या रंगाची साडी घेण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या सध्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. यावर्षी कोणत्या साड्या बजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत? मकरसंक्रांत हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान केले जातात. शिवाय संक्रांतीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात. त्यामुळे यावर्षी बाजारात आर्ट सिल्क, कल्यानी सिल्क, सॉफ्ट सिल्क, फॅन्सी सिल्क, रॉ सिल्क, बनारसी सिल्क, पैठणी, ट्रिपल मुनिया, पैठणी, कांजीवरम, फॅन्सी शिफोन अश्या विविध प्रकारच्या काळ्या रंगाच्या साड्या बजारपेठेत उपलब्ध आहेत. वेगवेगळी डिझाईन असलेल्या व नव्या फॅशननुसार तयार झालेल्या या साड्या चांगल्याच विक्री होत आहेत.
काय आहे किंमत? या वर्षी साडीच्या प्रत्येक प्रकारात काळारंग उपलब्ध आहे. ग्राहकांना जशी आवडेल तशीच साडी आमच्याकडे मिळते. साडीच्या पदरापासून ते ब्लाउजपर्यंत साडी डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. आकर्षक डिझाईन ग्राहकांचं लक्ष वेधून घेते. 500 रुपयांपासून आमच्याकडे साड्या उपलब्ध आहेत, असं पेथाणी साडीच्या दुकानातील कर्मचारी करण चौधरी यांनी सांगितलं.
कुठे खरेदी करता येतील साड्या? दादा साहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, दादर, मुंबई, महाराष्ट्र
संपर्क - 097027 07005