JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

VIDEO: मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

मुंबई, 11 जून : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. या मार्केटच्या तळमजल्यावर आगीने पेट घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सव्वा सहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मार्केटमध्ये अनेक छोटी दुकानं असून यामध्ये मोठ्या प्रमाणात माल भरलेला असतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. या मार्केटच्या तळमजल्यावर आगीने पेट घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सव्वा सहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मार्केटमध्ये अनेक छोटी दुकानं असून यामध्ये मोठ्या प्रमाणात माल भरलेला असतो. त्यामुळे एकूण काय नुकसान झालं याबद्दल अद्याप काहीही माहिती हाती आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आग विझवण्याचं काम सुरू आहे. कोणी आतील दुकानांमध्ये अडकलं तर नाही याचाही शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या