माझगाव,17 फेब्रुवारी: माझगावच्या जीएसटी भवनाला सोमवारी मोठी आग लागली होती.जीएसटी भवनाच्या 8व्या मजल्याला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी 9 व्या मजव्यावर रोखली. पाण्याच्या 20 बंबाच्या मदतीने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भवनामध्ये असलेली महत्त्वाची सगळी कागदपत्रं जळून खाक झाली असून सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे इमारतीमध्ये कोणीही अडकलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सुरू नसून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मोठी आणि जुनी इमारत असल्यामुळे चहुबाजूने आगीने वेढा घातला आहे. या इमारतीमध्ये काही सरकारी कार्यालयेदेखील आहेत. त्यात कार्यालयीन कामकाजाचा आठवड्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वर्दळ ऑफिसमध्ये होती. इमारतीमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू आहे. अद्याप कोणीही इमारतीमध्ये अडकले असल्याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
आग आटोक्यात आली असूनही काही ठिकाणी धूर निघत आहे. दरम्यान, इमारतीचं काम सुरू आहे. त्यामुळे फर्निचर आणि कागदपत्रांमुळे आगीचा लोळ वाढला आहे. आगी आणखी धुमसत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळावरून हाती आलेल्या व्हिडिओनुसार, मोठ्या प्रमाणात धूर दिसत आहे. पण इमारतीच्या आतमध्ये आग धुमसत असल्याचं सांगण्यात येत आहे.