JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Lockdown 5 : दुकानं उघडण्यासाठी असतील हे नियम, मॉल्ससह अजून काय राहणार बंद?

Lockdown 5 : दुकानं उघडण्यासाठी असतील हे नियम, मॉल्ससह अजून काय राहणार बंद?

अनेक गोष्टींना सूट देण्यात आली असल्याने लॉकडाऊनच्या या टप्प्याला अनलॉक 1 असंही म्हटलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे : लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता राज्य सरकारने या लॉकडाऊन 5 साठी नियमावली जाहीर केली आहे. अनेक गोष्टींना सूट देण्यात आली असल्याने लॉकडाऊनच्या या टप्प्याला अनलॉक 1 असंही म्हटलं जात आहे. मात्र असं असलं तरीही या टप्प्यातही काही गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही. तसंच ज्या गोष्टींना परवानगी मिळाली आहे, त्यातही अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन 5 मध्ये मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स यांना परवानगी देण्यात आलेली नाही. तसंच धार्मिक स्थळे उघडण्याबाबतही कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. कन्टेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. तर इतर भागात काही अटीसंह दुकाने उडण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि वाहनांनाही सशर्त परवानगी दिली आहे. दुकाने उघडण्यासाठी काय आहेत नियम आणि अटी? रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने एकाचदिवशी उघडण्यास परवानगी नाही. ऑड आणि इव्हन या नियमाप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकाने उघडण्यासाठीची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 5 दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची जबाबदारी दुकान मालकांची दुकानासमोर योग्य अंतर ठेवण्यासाठी मार्किंग करणे दुकानदारांसाठी बंधनकारक तसंच या दुकानांनी नियमांचं उल्लंघन करण्यात अशी दुकाने प्रशासनाकडून बंद करण्यात येतील. कपड्यांच्या दुकानात ट्रायल रूमला परवानगी नाही

राज्य सरकारच्या नियमावलीतील इतर ठळक मुद्दे : व्यायामासाठी खुल्या मैदानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. (सकाळी 5 ते सांयकाळी 7) मात्र गर्दी करण्यास बंदी 5 जूनपासून काही भागातील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी नाही वाहनांनाही परवानगी, मात्र प्रवासी संख्येला मर्यादा कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी दिली जाईल. या भागांमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाईल या झोनमध्ये येण्यास किंवा बाहेर जाण्यास परवानगी नाही कन्टेन्मेंट झोनबाबत महापालिकांना अधिकार संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या