JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / कोरोनाबाधितांच्या संख्येने मुंबई हादरली, आत्तापर्यंतची झाली सगळ्यात मोठी वाढ

कोरोनाबाधितांच्या संख्येने मुंबई हादरली, आत्तापर्यंतची झाली सगळ्यात मोठी वाढ

कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19967 वर पोहचली आहे. आज कोरोनामुळे 38 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 734 जणाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 मे : मुंबईत कोरोनाबधितांची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झालीय.एकाच दिवसात तब्बल 1571 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून प्रशासन हादरून गेलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19967 वर पोहचली आहे. आज कोरोनामुळे 38 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 734 जणाचा मृत्यू झाला आहे. तर आज 206 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 5010 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज ८८ नवे कोरोनाबधित रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण संख्या ११७८ एवढी झाली आहे. आज २० रुग्ण बरे झाले. तर एकूण ३०३ रुग्ण बरे झालेत. ८२५ रुग्ण उपचार घेत आहेत. आज दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ५० वर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनबाबत उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला  आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. याआधी सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 30 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज (17 मे) संपत आहे. उद्यापासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. Lockdown मध्ये आजारी बापासह सायकलवरुन लेकीने केला 7 दिवसात 1000 किमी प्रवास या टप्प्यात राज्य सरकारने अधिक अटी शिथिल करण्याची तयारी केली आहे. रेड झोन क्षेत्रांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जर शासकीय कार्यालय येत असतील तर ते बंद राहतील, अशा स्वरूपाचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढले आहेत. हे वाचा - ऑनलाईन जेवण ऑर्डर केली असेल तर या 6 गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही कोरोना लॉकडाउन 4.0मध्ये देशात 12 तास असणार कर्फ्यू, अशा आहेत नव्या अटी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या