JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Rain : मुंबईत पावसाची हजेरी, उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार

Mumbai Rain : मुंबईत पावसाची हजेरी, उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार

Mumbai Rain : रात्रीपासून मुंबई उपनगरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : रात्रीपासून मुंबई उपनगरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे अरबी समुद्रातून गारवा येत आहे. सध्या मुंबईत हलका ते मध्यम  पाऊस पडत आहे. यात उपनगरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातवारण होते. पहाटे पाचच्या सुमारास विरार पूर्वेकडे चंदनसार कोपरी चिखल डोंगरी खानिवडे या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली मात्र त्याच वेळी नालासोपाऱ्यात तुरळक पाऊस पडत होता.

संबंधित बातम्या

पहाटेच्या या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या  नागरिकांना  गारवा निर्माण झाला आहे. मात्र विरारच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पिकावर परिणाम होणार आहे. तसेच विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर सुखद घातली सुकी मासळी  भिजल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या