JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Gram Panchayat Results : मुंबई जवळच्या ग्रामपंचायतीमध्येच शिवसेनेला मोठा धक्का, फक्त एका जागेवर विजय

Gram Panchayat Results : मुंबई जवळच्या ग्रामपंचायतीमध्येच शिवसेनेला मोठा धक्का, फक्त एका जागेवर विजय

राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाचं (Gram Panchayat Election Results) चित्र आता हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला (Shivsena) हादरा बसला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंबरनाथ, 18 जानेवारी : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाचं (Gram Panchayat Election Results) चित्र आता हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला (Shivsena) हादरा बसला आहे. 11 पैकी 9 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठ्या नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये 13 जागा होत्या, त्यातल्या दोन प्रभागात बहिष्कार असल्याने 11 जागांवर निवडणूक होणार होती, मात्र 11 मधील 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये 1 शिवसेना तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध आले होते .उर्वरित आठ जागांवर निवडणूक झाली, यामधील 1 जागेवर शिवसेना तर उर्वरीत 7 जागावर भाजपचे उमेदवार निवडून आले. तर अंबरनाथच्या उसाटणे गावात भाजपविरुद्ध सर्व पक्ष असा संघर्ष पाहायला मिळाला. या गावात मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. उसाटणे ग्रामपंचायतीवर 7 पैकी 7 जागांवर निर्विवाद कब्जा मिळवला, तर भाजपच्या हाती भोपळा आला. या गावाच्या निवडणुकीत 2 जागा बिनविरोध आल्या, तर 5 जागांवर मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पॅनलने विजय मिळवला. कल्याणच्या सगळ्यात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपला धक्का लागला आहे. 17 पैकी 11 जागांवर महाविकासआघाडीचा विजय झाला आङेत, तर भाजपला 6 जागांवर यश आलं आहे. कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायती मध्ये शिवसेना भाजप मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत होती. 17 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात होते .आज निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारांनी 11 जागा काबीज केल्या तर भाजपला 6 जागावर समाधान मानावे लागले .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या