JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / प्रेम एकीशी आणि संसाराचा बेत दुसरीशी; मुंबईत प्रियकराच्या घरासमोरच प्रेयसीनं घेतलं पेटवून

प्रेम एकीशी आणि संसाराचा बेत दुसरीशी; मुंबईत प्रियकराच्या घरासमोरच प्रेयसीनं घेतलं पेटवून

Suicide Case Mumbai: प्रियकराचा साखरपुडा झाल्याचं समजल्यानंतर मुंबईतील एका तरुणी रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात

file photo

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट: प्रियकराचा साखरपुडा झाल्याचं समजल्यानंतर मुंबईतील एका तरुणी रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून (Girlfriend set herself on fire) घेतल्याची घटना समोर आली आहे. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्वरित आग विझवून पीडितेला रुग्णालयात दाखल केलं आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित तरुणी गंभीर जखमी (get injured)  झाली असून 89 टक्के भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सामना नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित 21 वर्षीय तरुणी सांताक्रूझ येथील रहिवासी आहे. जखमी तरुणी तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये एका लग्नासाठी गेली होती. दरम्यान याठिकाणी तिची एका तरुणाशी ओळख झाली. यानंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. दोघांचं बोलणं वाढलं. यातून दोघाचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनी लग्न करण्याचं देखील ठरवलं होतं. याबाबत त्यांनी आपल्या पालकांना प्रेमसंबंधाबाबत सांगितलं. पण संबंधित तरुण तरुणी दुरच्या नात्यानं एकमेकांचे भाऊ बहिण लागतात असं सांगून लग्नाला नकार दिला. हेही वाचा- वंशाच्या दिव्यासाठी महिलेला नग्न करून अंगारा फासला, पुण्यातील संतापजनक घटना यानंतर तरुणाच्या पालकांनी आपल्या मुलासाठी एक वेगळीच मुलगी शोधली आणि पीडितेला काही कळायच्या आत साखरपुडाही उरकला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणीनं आपल्या प्रियकराच्या घरी सात रस्ता याठिकाणी जाऊन गोंधळ घातला आहे. आरडाओरडा केल्यानंतर संबंधित तरुणी प्रियकारच्या घरात घुसली, घरातील रॉकेलचं कॅन घेत त्यातील रॉकेल अंगावर ओतून घेतलं. यानंतर पुढच्या क्षणात तरुणीनं स्वत:ला पेटवून घेतलं आहे. हेही वाचा- गोड बोलून नेलं अन् 6 जणांच्या हवाली केलं, 13 वर्षीय मुलीसोबत किळसवाणं कृत्य तरुणीनं पेटवून घेतल्याची घटना घडताच आजूबाजूच्या लोकांनी त्वरित आग विझवली आणि तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित तरुणी 89 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याची डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. संबंधित तरुणी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या