JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / Ganesh Chaturthi 2021: गणपतीची तयारी करण्याअगोदर हे नियम वाचा; यंदाही नसणार मिरवणूक

Ganesh Chaturthi 2021: गणपतीची तयारी करण्याअगोदर हे नियम वाचा; यंदाही नसणार मिरवणूक

कोरोनाव्हायरच्या तिसऱ्या लाटेच्या संकेतामुळे यावर्षीसुद्धा गणेशोत्सावावर साथीचं सावट आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबईसह बहुतेक शहरांच्या प्रशासनांनी हे नियम घातले आहेत.

0114

गणेशोत्सवाची तयारी सुरू केली असेल, पण Covid-19 चा धोका अद्याप टळलेला नाही आणि यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या निर्बंधांमध्येच साजरा करावा लागणार आहे.

जाहिरात
0214

घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने नियम घालून दिले आहेत. ते जाणून घेण्यासाठी स्क्रोल करा..

जाहिरात
0314

गणेशोत्सव काळात कुठल्याही मंडपात गर्दी होता कामा नये. नाहीतर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.

जाहिरात
0414

सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट राहणार आहे. त्यापेक्षा मोठ्या मूर्तीला परवानगी नाही.

जाहिरात
0514

लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी दर्शनाला जाऊ नये.

जाहिरात
0614

घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी. त्यापेक्षा मोठ्या गणपतीला परवानगी नाही.

जाहिरात
0714

या वर्षीसुद्धा विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही.

जाहिरात
0814

घरगुती गणपतींचं विसर्जन शक्यतो घरातच मोठ्या बादलीत करावं.

जाहिरात
0914

ही अशी गर्दी या वर्षी परवडणारी नाही. गर्दी होईल असे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

जाहिरात
1014

मुंबई महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था 84 ठिकाणी केली आहे.

जाहिरात
1114

गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

जाहिरात
1214

आरतीसारख्या कार्यक्रमांच्या वेळी भक्तांची गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन दर्शन ठेवावं, असं मोठ्या मंडळांना आवाहन करण्यात आलं आहे.

जाहिरात
1314

भक्तांना, कार्यकर्त्यांना विसर्जन स्थळी गर्दी करता येणार नाही. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या हाती द्यावी लागेल. महापालिकेने नेमलेले कर्मचारी विसर्जन करतील.

जाहिरात
1414

कोरोनाव्हायरच्या तिसऱ्या लाटेच्या संकेतामुळे यावर्षीसुद्धा गणेशोत्सावावर साथीचं सावट आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबईसह बहुतेक शहरांच्या प्रशासनांनी हे नियम घातले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या