JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईमध्ये मोठी दुर्घटना; भरधाव कारने अनेकांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू, 4 जखमी

मुंबईमध्ये मोठी दुर्घटना; भरधाव कारने अनेकांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू, 4 जखमी

अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून वेगात एक गाडी आली आणि हॉटेलसमोर उभा असलेल्या 8 जणांना उडवलं.

जाहिरात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 वाजून 15 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून वेगात एक गाडी आली आणि हॉटेलसमोर उभा असलेल्या 8 जणांना उडवलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट : मुंबई शहरात आज पुन्हा एकदा भरधाव कारने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलच्या जवळ एका सुसाट कारने 8 जणांना चिरडलं आहे. यातील 4 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 4 जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 वाजून 15 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून वेगात एक गाडी आली आणि तिने हॉटेलसमोर उभा असलेल्या 8 जणांना उडवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

घटना घडल्यानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मुंबईत याआधी देखील अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचंही पाहायला मिळालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या