JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी; सुप्रिया सुळेंनीही केली चूक

लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी; सुप्रिया सुळेंनीही केली चूक

सुमित्रा महाजन यांच्या मुलानेही ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं असून सुमित्रा महाजन यांची प्रकृती स्थिर आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 22 एप्रिल : लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना काल इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आज त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्हही आला आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे ही अफवा अधिक पसरली आहे. (sumitra mahajans death fake news) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी खोटी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप होता, त्यामुळे त्यांना इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याशिवाय गुरुवारी त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्हही आला होता.

जाहिरात

शशी थरूर यांनीही याबाबत ट्वीट केलं होतं. मात्र काही वेळाने त्यांनी ते ट्वीट डिलिट केलं. आणि चुकीचं ट्वीट केल्याबाबत माफी मागितली. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मध्यप्रदेशातील इंदूर शहरातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी शहरात 1781 रुग्ण समोर आले. त्याशिवाय या शहरात कोरोनाच्या घातक व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत 94 हजार 549 जणं बाधित झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या