JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / DHFL घोटाळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या जावई आणि मुलीची प्रॉपर्टी ED कडून जप्त

DHFL घोटाळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या जावई आणि मुलीची प्रॉपर्टी ED कडून जप्त

PMC Bank Scam ED attached Priti Shroff Property: प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची संपत्ती अधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथील आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 मार्च : दिवाळखोरीत निघालेल्या दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (DHFL) प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde Daughter) यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED ने जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे आहे. अनेक घोटाळ्यांमध्ये सामिल DHFL - सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकने (PMC Bank Scam) दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडला (DHFL) दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांचं कर्ज फ्रॉड घोषित केलं. या कंपनीची YES बँकमध्येही लोन घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधु अटकेत असून ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. येस बँक लोन घोटाळ्याप्रकरणी ईडीने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अटॅच आहे. यात राणा कपूर यांची 1000 कोटी आणि वाधवान बंधुंची 1400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सामिल आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने DHFL प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलकडे (NCLT)सोपवलं होतं. DHFL अशी पहिली वित्तीय कंपनी आहे, जी RBI ने कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत NCLT मध्ये पाठवली होती. यापूर्वी कंपनी बोर्डाला बरखास्त करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या