JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / ...तर लसीकरणाला परवानगी नाही; Corona vaccination बाबत BMC च्या नव्या सूचना

...तर लसीकरणाला परवानगी नाही; Corona vaccination बाबत BMC च्या नव्या सूचना

मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत काही नियम जारी केले आहेत.

0106

कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त सरकारी नाही तर खासगी लसीकरण केंद्रांवरही लस दिली जाते आहे.

जाहिरात
0206

मुंबईत महापालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात लस दिली जाते आहे. तसंच खासगी लसीकरण केंद्रामार्फत काही ऑफिसमध्येही लसीकरण कार्यक्रम राबवला जातो आहे.

जाहिरात
0306

दरम्यान मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं पालन करणं बंधनकारक आहे.

जाहिरात
0406

महापालिका, सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रावर कोणतंही राजकीय फलक, बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज लावण्यात मनाई करण्यात आली आहे.

जाहिरात
0506

खासगी लसीकरण केंद्रांनी औद्यागिक संस्थांमध्ये लसीकरण करण्यापूर्वी संबंधित संस्थेशी करार करावा. यामध्ये खासगी केंद्रामार्फत उपलब्ध असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची उपलब्धता याबाबत स्पष्टपणे उल्लेख असावा. 

जाहिरात
0606

मुंबई बाहेरील कुठल्याही खाजगी लसीकरण केंद्राला मुंबईत येऊन लसीकरण करण्याची मुभा नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या