Corona vaccination In Mumbai : मुंबईतील कोरोना लसीकरण मोहीम दोन टप्प्यात विभागण्यात आली आहे.
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाते आहे. 1 मेपासून 18+ नागरिकांनाही कोरोना लस दिली जाते आहे.
त्यामुळे अनेक नागरिकांनी लस घेतली आहे, तर काही लस घेण्याच्या तयारीत आहे. तुम्हीसुद्धा कोरोना लस घेण्याच्या तयारी असाल आणि मुंबईत राहत असाल तर मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवसच वॉक इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल. म्हणजे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथं नोंदणी करून तुम्हाला लस घेता येईल.
वॉक इन लसीकरणाची सुविधा फक्त 60 पेक्षा जास्त वयाचे नागरिक, दिव्यांग नागरिक आणि कोरोना लशाची दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच असेल.
तर गुरुवार शुक्रवार, शनिवारी प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 टक्के लसीकरण हे केवळ कोविनवर नोंदणी आणि त्यानंतर लसीकरण केंद्र आणि लसीकरणाची वेळ निश्चित झाल्यावर होईल.