मुंबई 15 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्रीची विमानात छेड काढणं एका व्यक्तिला चांगलंच महागात पडलंय. दिंडोशी कोर्टाने या आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. POCSO कायद्याच्या कलम 354 नुसार ही शिक्षा सुनावण्यात आलीय. विकास सचदेवा असं या आरोपीचं नाव आहे. 2017मध्ये ही घटना घडल्यानंतर त्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक VIDEO पोस्ट करून प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर विकासविरुद्ध त्या अभिनेत्रीने गुन्हा दाखल केला होता. ही अभिनेत्री 10 डिसेंबर 2017 ला विस्तारा एअरलाईन्सने दिल्लीहून मुंबईला येत होती. त्याच फ्लाईटमध्ये विकास सचदेवाही होता. तो त्या अभिनेत्रीच्या मागच्या सीटवर बसलेला होती. त्याने त्या अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओत त्या अभिनेत्रीजे जे घडलं ते रडत रडत सांगितलं होतं. अडीच तासांचा तो प्रवास हा अतिशय यातना देणारा ठरला आहे. हा घाणेरडा प्रकार 5 ते 10 मिनिटं चालला. मला तो व्हिडीओत शुट करायचा होता मात्र अपुरा प्रकाश असल्याने मी तो शुट करू शकली नाही असंही तिने म्हटलं होतं.
तर विकासच्या पत्नीने सर्व आरोप फेटाळले होते. माझा नवरा निर्दोष आहे. त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही. विकासला यात अडकविण्यात आल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. ही घटना घडली तेव्हा ती अभिनेत्री ही फक्त 17 वर्षांची होती. घटनेनंतर त्याची सोशल मीडियावर खूप चर्चाही झाली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.