JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भाजपच्या नगरसेवकाला अटक; महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा धक्कादायक आरोप

भाजपच्या नगरसेवकाला अटक; महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा धक्कादायक आरोप

नगरसेवकाच्या अटकेच्या वृत्तामुळे भाजपच्या गोठ्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Anil Deshmuk in State Budget Session मुरबाड, 4 मार्च : मुरबाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे.  राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (State Budget Session) सुरू आहे. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. हे ही वाचा- मला व्हिलन म्हणायचे खुशाल म्हणा पण..,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडेंवरील आरोपनंतर पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. हे प्रकरण ताजं असतानाही भाजप नगरसेवकाच्या अटकेचे वृत्त समोर आले आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक असून त्यांच्यावर महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (State Budget Session) सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांना आवर घालण्यापेक्षा सत्तारूढ पक्षाने आपल्याच सहकारी पक्षाची कोंडी केली आहे. विशेषतः विरोधकांना उत्तर देण्याच्या नादात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोघांनी काँग्रेसची कोंडी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्यपाल 12 आमदार देणार नाही तोपर्यंत मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ आम्ही देणार नाही,अस विधान करून काँग्रेसची मोठी अडचण केली.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या