JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी! मुंबईत पार्किंगमध्ये आढळली 48 जिवंत काडतुसं; घटनेनंतर परिसरात खळबळ

मोठी बातमी! मुंबईत पार्किंगमध्ये आढळली 48 जिवंत काडतुसं; घटनेनंतर परिसरात खळबळ

Crime in Mumbai: मंगळवारी रात्री मुंबईतील (Mumbai) आरे मिल्क कॉलनीजवळील (Aarey Milk Colony) एका पार्किंगमध्ये 48 जिवंत काडतुसं (48 live cartridges) आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून: मंगळवारी रात्री मुंबईतील (Mumbai) आरे मिल्क कॉलनीजवळील (Aarey Milk Colony) एका पार्किंगमध्ये 48 जिवंत काडतुसं (48 live cartridges) आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही काडतुसं 0.2 मिमी प्रकारची असून पार्किंग परिसरात नेमकी कोणी ठेवली, याची काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास स्थानिक नागरिकांकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित काडतुसं जप्त केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. स्थानिक पोलीस अधिकारी प्रसाद पिटले यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबईच्या आरे मिल्क कॉलनीतील एका पार्किंग परिसरात काही जिवंत काडतुसे आढळल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. पार्किंग परिसरात ही काडतुसे कोणी सोडली आणि का सोडली? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण पार्किंग परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा- विद्येचं माहेरघर बनतंय क्राइम सिटी? पुण्यात 6 महिन्यात गँगवॉरमधून 38 जणांचा खून हा पार्किंग परिसर गजबजलेला असल्यानं याठिकाणी बऱ्याच लोकांनी ये-जा केली आहे. त्यामुळे संबंधित काडतुसे नेमकी कोणी ठेवली हे शोधण्यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. सध्या पोलिसांकडून पार्किंग परिसरात तैनात असलेला सुरक्षा रक्षक आणि काडतुसे पाहिलेल्या अन्य साक्षीदारांचे जाब नोंदवून घेण्यात येत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या