मुंबईत बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह
मुंबई, 02 जून : मुंबईत भाईंदरच्या खाडीत शुक्रवारी एका बॅगेत तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे शीर गायब आहे. तसंच मृत तरुणीच्या हातावर त्रिशूल आणि ओमचा टॅटू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे वय 25 ते 30 वर्षे या दरम्यान आहे. मृतदेह 3 ते 4 दिवसांपूर्वीचा असून तो बॅगेत भरून समुद्रात फेकला होता. पोलिसांनी खून प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. आता तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगेत सापडलेला मृतदेह अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या महिलेचा आहे. तिच्या हातावर त्रिशूल व ओम चित्र असलेला टॅटू गोंदवलेला आहे. मृतदेह असलेली बॅग पाण्यात वाहून आलेली असून नेमकी कुठून आली आहे याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. Delhi Murder Case : अपमानाचा बदला म्हणून खून, आदल्यादिवशी साहिलसोबत काय घडलं? मृतदेहाला शीर नसल्यानं महिलेची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. ही तरुणी कोण आहे, खून कोणी व कुठे केला? खूनाचं कारण काय? याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान कोणाच्या घरातील वीस ते तीस वर्षांची महिला बेपत्ता असल्यास उत्तन सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. चार दिवसांपूर्वीही आढळला होता तरुणीचा मृतदेह वाशिम जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी एका गोणीत मुलीचा शीर कापलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. आरोपीने चौकशीवेळी सांगितलं होतं की, मुलगी गतिमंद असल्याने त्रासला होता. यामुळे मुलीचा खून केला.