JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Assembly Speaker Election : निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का, 2 मतं झाली कमी

Assembly Speaker Election : निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का, 2 मतं झाली कमी

विधानसभा अध्यपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) थोड्याच वेळात होत आहे. या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जुलै : विधानसभा अध्यपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) थोड्याच वेळात होत आहे. या निवडणुकीत भाजपाचे  राहुल नार्वेकर विरूद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी लढत आहे. या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलमध्ये असलेले नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या मदतानास उपस्थित राहण्यासाठी त्यांनी कोर्टाची परवानगी घेतली नव्हती. 10 जूनला झालेल्या राज्यसभा निवडणूक आणि 20 जूनला झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मत देता आलं नव्हतं. तर उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला मतदान करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली होती. पण, त्यापूर्वीच ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. नवाब मलिक (Nawab Malik) हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे शंभर कोटी घोटाळ्याच्या आरोप प्रकरणात अटकेत आहेत. ईडीच्या विरोधानंतर त्यांचा जामीन अर्ज कोर्टानं यापूर्वी फेटाळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या