JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / नियम तोडले या पठ्ठ्याने आणि दंड बसला प्रसिध्द उद्योगपती रतन टाटांना!

नियम तोडले या पठ्ठ्याने आणि दंड बसला प्रसिध्द उद्योगपती रतन टाटांना!

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी दंड बसला.

जाहिरात

टाटा ट्रस्ट – केवळ टाटा ट्रस्टचं नाही तर यात जेएन टाटा एंडोमेंट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, लेडी टाटा मेमोरिअल ट्रस्ट, लेडी मेहरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट, जेआरडी आणि थेल्मा जे टाटा ट्रस्ट आदी महत्त्वपूर्ण नावांचा समावेश आहे. या संस्था गेल्या अनेक दशकांपासून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संरक्षण, सामुदायिक विकास आदी क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. टाटा समूह देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून देशाचा विचार करीत होती. त्याचकारणास्तव जमशेद जी टाटा यांनी 1898 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची उभारणी केली. याचा उद्देश विज्ञानातील अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था करणं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जानेवारी : रतन टाटांच्या (Ratan Tata) गाडीचा नंबर लकी आहे म्हणून स्वत:च्या गाडीवर लावून फिरणारा हा महाभाग मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योगपती असून त्याने हा प्रताप केला आहे. एवढच नाही तर या पठ्ठ्याने उद्योगपती रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर आपल्या गाडीला लावून वाहतूक नियंमांचे उल्लंघन देखील केले आहे. वाहतूक नियंत्रण शाखा, वाहतूक पोलीस मुख्यालय, वरळी, मुंबई येथे एक वाहन चालक हा बनावट वाहन क्रमांकाचा वापर करीत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.  प्रसिध्द उद्योजक रतन टाटा यांच्या मालकीच्या वाहन क्रमांकाचा वापर करुन एक प्रसिध्द उद्योगपती वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. हा प्रकार समोर येताच मुंबई शहरामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करुन व अथक परिश्रम घेऊन वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचा नंबर आपल्या गाडीवर लावून फिरणा-या महाभागाचा शोध लावला. ज्या गाडीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचा नंबर लावण्यात आला होता ती गाडी मे. नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा. लि. यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. ही गाडी जो उद्योगती वापरत होता त्याने प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचा गाडी नंबर का वापरत होता याचे कारण सांगितल्यावर पोलिसही चक्रावून गेले. अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी मुळ नंबरप्लेटमध्ये बदल करुन बनावट नंबरप्लेटचा वापर करीत असल्याचे तपासात त्याने आरोपीने कबूल केले. त्यानुसार मे. नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा. लि. च्या संचालक यांच्या विरुध्द बनावट नंबरप्लेटचा वापर करुन कायद्याचा भंग केल्याने माटुंगा पोलीस ठाणे येथे गु.रक्र. ०३/२०२१ कलम ४२०,४६५ भादविसह ३९,१९२ मोटर वाहन कायदासह केंद्रीय मोटर वाहन नियम ५०/१७७ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आणि प्रसिद्ध उद्योगपती श्री. रतन टाटा यांना इ चलन मार्फत बसलेले दंड हे आरोपीकडून वसूल करण्यात आले आहे. यशस्वी यादव, पोलीस सह आयुक्‍त, वाहतूक, मुंबई यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदिप फणसे, पो. ह. क्र. ३२४२५/अजीज शेख यांनी वरीलप्रमाणे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा करुन रोख रक्‍कम रु. ५,०००/- बक्षिस जाहिर केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या