JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / तुमचा श्वान हरवला तर लगेच सापडणार! मुंबईकर तरुणाची भन्नाट आयडिया पाहाच VIDEO

तुमचा श्वान हरवला तर लगेच सापडणार! मुंबईकर तरुणाची भन्नाट आयडिया पाहाच VIDEO

मुंबईतील एका तरुणानं प्राण्यांसाठी आधार कार्ड बनवले आहे. यामधून प्राण्यांची पूर्ण माहिती मिळते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 13 मे : पॅनकार्ड, व्होटिंग कार्डप्रमाणे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड ही आज तितकेच गरजेचे झाले आहे. यातून बरीच कामे सोप्पी झाली आहेत. मात्र, प्राण्याचं आधार कार्ड कधी एकल आहे का? मुंबईतील एका तरुणाने क्यूआर कोडचा वापर करून कुत्रे, मांजरी यांच्यासाठी आधार कार्ड तयार केलं आहे. यामधून आपल्याला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्राण्यांची पूर्ण माहिती मिळते. कोणी केलं तयार आधार कार्ड? मुंबईतील 23 वर्षीय तरुण अक्षय रिडलान या इंजिनिअर तरूणाने हे आधार कार्ड बनवले आहे. अक्षय हा पावफ्रेंड इन संस्थेचा संस्थापक आहे. रस्त्यावर राहणारे भटके कुत्रे-मांजरी, पाळीव कुत्रे- मांजरी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याने हे आधार कार्ड बनवले आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कुत्रे, मांजरी यांची पूर्ण माहिती या आधार कार्डमध्ये मिळते. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्राण्यांचे नाव, वैद्यकीय इतिहास आणि त्याच्या देखभाल करणार्‍यांचे संपर्क तपशील यासह बरेच काही जाणून घेता येते.

कशी सुचली कल्पना? लहानपणापासून मला प्राण्यांचा लळा होता. महाविद्यालयात शिकत असताना काळू नावाचा भटका कुत्रा माझा मित्र होता. मात्र, अचानक तो तिथून निघून गेल्यानंतर आजपर्यंत तो मला मिळालाच नाही. त्यांनतर बराच शोध घेतला विचार केला तेव्हा असे अनेक प्राणी गायब होतात ते कुठे जातात. याचा शोध घेण्यासाठी मायक्रो चिपचा विचार मनात आला.

तुमच्या कुत्र्याला सोडून बिनधास्त फिरायला जा, ‘इथं’ घेतली जाते शाही काळजी, Video

संबंधित बातम्या

मात्र भारतात मायक्रो चीप महाग मिळतात. पण सध्याच्या काळात क्यूआर कोडचा वापर प्रत्येक ठिकाणी करत आहोत. म्हणून विचार केला की प्राण्यांसाठी या क्यूआर कोडचा वापर का होऊ नये. म्हणून या संकल्पनेवर क्यूआर कोड मधील माहिती जतन करण्यासाठी  https://pawfriend.in/ वेबसाईट तयार केली. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर, प्राण्यांचे नाव, वैद्यकीय इतिहास आणि त्याच्या देखभाल करणार्‍यांचे संपर्क तपशील यासह बरीच माहिती जाणून घेता येते आणि आपल्या हरवलेल्या प्राण्यांला शोधन सोप्पं होतं, असं अक्षय रिडलान सांगतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या