JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मराठी मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने सुरू केला आंबे विक्रीचा व्यवसाय, हे आहे कारण

मराठी मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने सुरू केला आंबे विक्रीचा व्यवसाय, हे आहे कारण

मराठी मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने आंबे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामागचे कारण तिने स्वतःहा सांगितले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 13 मे :  मुंबईकरांना  आंब्याची चव चाखता यावी यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळच्या पालिकेच्या मैदानावर आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. या आंबा महोत्सवात एका मराठी मालिकेतून आवनी या नावाने घराघरात पोहचलेली अभिनेत्री साक्षी गांधीने आंबा विक्रीचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. साक्षी गांधी या आंबा महोत्सवात आंब्याची विक्री करत आहे. साक्षीचा सावनी मँगोज स्टॉल  दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळच्या पालिकेच्या मैदानावर विक्रांत आचरेकर प्रस्तुत आंबा महोत्सव 2023 चं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात विविध भागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक असा हा उपक्रम असून यामध्ये अभिनेत्री साक्षी गांधी हिने देखील सहभाग घेतला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात साक्षीचा सावनी मँगोज या नावाचा स्टॉल आहे.

नैसर्गिकरित्या पिकवले आंबे  साक्षीने रत्नागिरी आंब्यांच्या विक्रीचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. विशेष म्हणजे साक्षीने तिच्या व्यवसायाचं नाव ‘सावनी मँगोज’ असं ठेवलं आहे. मालिकेत तिचं नाव आवनी आहे. आणि तिचं खरं नाव साक्षी त्यामुळे या दोन्ही नावांना एक करत तिने सावनी हे नाव व्यवसायासाठी निवडलं आहे. तिने हे आंबे नैसर्गिकरित्या पिकवले आहेत. यामध्ये गांडूळ खताचा वापर करून नैसर्गिकपणे पिकवलेला रत्नागिरी आंबा तिने मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

Wardha News: शाळेत गाणं गायलं आणि पुढं आयुष्यच बदललं, आर्षचा संगितमय प्रवास, तुम्हालाही वाटेल कौतुक, Video

संबंधित बातम्या

का केला व्यवसाय सुरु? अभिनेत्री असले तरी मी एक माणूस आहे. मलाही व्यवसाय क्षेत्रात बऱ्याच दिवसांपासून यायचा विचार सुरू होता. या वर्षी उन्हाळ्यात या आंबा विक्रीच्या व्यवसायाची सुरुवात केली. नैर्गिकरीत्या तयार केलेला आंबा खूप कमी ठिकाणी पहायला मिळतो. मी रत्नागिरी येथील असल्यामुळे त्या क्षेत्रातील आंब्यांना वेगळी चव असते. त्यांना मागणी सुद्धा असते. त्यासाठी हे आंबे नागरिकांना मिळावे यासाठी हा व्यवसाय सुरू केला. या स्टॉलवर असलेल्या आंब्याच वजन हे 260 ते 300 ग्रॅम इतके असून 900 ते 1100 असे दर आहेत. लोकांना परवडेल याच किंमतीत आंबा देत असल्याचं साक्षीने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या