मुंबई, 8 मार्च : आज 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलींच्या सुरक्षिततेसोबतच त्यांना भक्कम आर्थिक भविष्यही देऊ शकता. तुमची आजची सुरुवात त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी बनवू शकते. किंबहुना मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता सतावू लागते. अशा परिस्थितीत दीर्घकालीन योजना बनवून, थोडी गुंतवणूक करून, तुम्ही येणाऱ्या काळात मोठा निधी उभारू शकता. हे पाच मार्ग आहेत ज्यात गुंतवणूक केल्याने मुलींना आर्थिक बळ मिळू शकते. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna) सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. हे खाते जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावाने कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. यामध्ये 1000 रुपयांपासून सुरू होऊन, तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करू शकता. त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. खाते उघडण्याची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर ते मॅच्युअर होईल आणि संपूर्ण रक्कम काढता येईल. डॉलरच्या तुलनेत रुपया 80-82 पर्यंत घसरण्याची शक्यता, असं झाल्यास काय परिणाम होईल; तज्ज्ञ काय सांगतात? नॅशनल सेविंग स्कीम (National Saving Scheme) ही योनजादेखील मुलींच्या नावाने उघडता येते. सध्या वार्षिक 7.6 टक्के हमी परतावा देत आहे. यामध्ये 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू करता येते, तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, ज्यावर कर सूट देखील उपलब्ध आहे. खाती एका नावावरून दुसऱ्या नावावरही ट्रान्सफर करता येतात. चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड (Children’s Gift Mutual Fund) मुलींच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात 18 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. ही रक्कम इक्विटी आणि डेट फंडात गुंतवली जाते. यावर निश्चित व्याज मिळत नसले तरी शेअर बाजाराशी निगडीत असल्याने जोरदार परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही SIP द्वारे दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास, 18 वर्षात 12 टक्के दराने तुम्हाला 38,27,197 रुपये मिळतील. तुमची एकूण गुंतवणूक फक्त 10.80 लाख रुपये असेल. UPI Payment: स्मार्टफोन नसेल तरी करता येणार UPI पेमेंट, काय आहे RBI ची सुविधा? सोने ETF (Gold ETF) तुम्हाला तुमच्या मुलीसाठी सोन्याचे दागिने किंवा इतर दागिने घ्यायचे असतील, तर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. हे गोल्ड फंड शेअर मार्केटमध्ये ट्रेड केले जातात, ज्यात इतर योजनांपेक्षा जास्त परतावा मिळण्याची क्षमता असते. सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही लॉकरची गरज नाही आणि चोरीची भीती नाही. यामध्ये मॅच्युरिटी कालावधी नाही, ज्यामुळे तुम्ही जेव्हा हवे तेव्हा ते विकू शकता आणि पैसे काढू शकता. युनिट लिंक्ड विमा योजना (Unit Linked Insurance Plan) विमा कंपन्यांनी देऊ केलेली योजना मुलींना दुहेरी संरक्षण देते. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIPs) मध्ये, जीवन विम्याचा लाभ मिळण्याबरोबरच, मॅच्युरिटीवर भरघोस परताव्याच्या स्वरूपात एक मोठा निधी देखील तयार केला जातो. विमा कंपन्या ULIP योजनांचे फायदे देखील स्वतंत्रपणे ठरवतात, ज्यावर 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.