JOIN US
मराठी बातम्या / मनी / 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्या जीवनात काय बदल होतील?

5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्या जीवनात काय बदल होतील?

4G नेटवर्कवर आपल्याला 100Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळतो, पण 5G वर तो स्पीड Gbps मध्ये उपलब्ध असेल. या नेटवर्कच्या अप्पर बँडमध्ये आपल्याला 100 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळू शकतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जुलै : गेल्या काही वर्षांपासून देशात 5G नेटवर्क येईल अशी चर्चा होती. पण आता अखेर भारतात 5G नेटवर्क लाँच करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. आज (26 जुलै 2022) 5G नेटवर्कसाठी लिलाव सुरू झाला आहे. 5G स्पेक्ट्रम लिलावात देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांसह इतर कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. यामध्ये जिओ (Jio), Vi आणि एअरटेलसह (Airtel ) गौतम अदानी यांच्या अदानी डेटा (Adani Data Networks ) नेटवर्कचा समावेश आहे. या लिलावात अदानी आणि अंबानी यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. देशात आता 5G येतंय, पण यामुळे काय नवीन काय घडणार, सामान्य माणसावर याचा काय परिणाम होणार, दैनंदिन जीवनात काय वेगळेपण येणार, असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. यातील काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. 2000 च्या दशकात मोठ्या प्रमाणात लोक 2G किंवा 3G नेटवर्क वापरत होते. भारतात 4G च्या एंट्रीनंतर इंटरनेट स्पीडचा नवा अनुभव लोकांनी घेतला. 4G नंतरच लोकांना व्हिडीओ कॉलिंग (Video Calling) आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसारख्या (Live Streaming) हायस्पीड गोष्टींचा अनुभव घेता आला. त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतरही आपल्याला अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. इंटरनेट स्पीड जास्त असणार बर्‍याच लोकांना असं वाटतंय की, 5G म्हणजे इंटरनेट स्पीड जास्त असणार. हे काही अंशी खरं आहे. कारण आता आपलं आयुष्य कॉलिंगच्या नाही तर डेटाच्या ट्रॅकवर धावतंय. त्यामुळे 5G इंटरनेट स्पीड 4G पेक्षा जास्त असेल. 4G नेटवर्कवर आपल्याला 100Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळतो, पण 5G वर तो स्पीड Gbps मध्ये उपलब्ध असेल. या नेटवर्कच्या अप्पर बँडमध्ये आपल्याला 100 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळू शकतो. चांगले नेटवर्क कव्हरेज 4G आल्यानंतर कॉल्स आणि कनेक्टिव्हिटी अजून चांगली होईल. तसंच 4G च्या तुलनेत कॉल क्वालिटी सुधारेल आणि चांगला अनुभव मिळेल. कॉल ड्रॉपची समस्याही कमी होईल. तसंच टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्क रेंज वाढवण्याचा दुसरा पर्याय मिळणार आहे. इतर फायदे 5G नेटवर्क 4G पेक्षा 100 पट जास्त फास्ट असेल. युजर्सना हाय क्वालिटी व्हिडीओ (Quality Video), अल्ट्रा हाय रिझोल्युशन व्हिडिओ कॉलिंग आणि इतर अनेक फायदे मिळतील. यामुळे इंटरनेटच्या (Internet Speed) स्लो स्पीडपासून आपली सुटका होईल. तसंच Metaverse सारखं नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांना उपलब्ध होईल. 5G नेटवर्क रोलआउट होऊन या सर्व गोष्टी सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल; पण शहरात लवकरच ही टेक्नॉलॉजी उपलब्ध होईल. मनू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या