JOIN US
मराठी बातम्या / मनी / vegetables price : या आठवड्यात भाजीपाल्याचे दर झाले दुप्पट; पावसाने नुकसान झाल्यानं आवक घटली

vegetables price : या आठवड्यात भाजीपाल्याचे दर झाले दुप्पट; पावसाने नुकसान झाल्यानं आवक घटली

भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य लोकांच्या किचनच्या बजेटवर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान (vegetables loss) झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : दिवाळीचा सण जवळ येत असतानाच भाज्यांचे भाव (vegetables rates) सातत्याने वाढत आहेत. अवकाळी पाऊस आणि घटत्या उत्पन्नाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या किमतींवर आणि सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरावर होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असतानाच आता भाजीपाल्याच्या (vegetables) किमतीही वाढत असल्याने सर्वसामान्यांना दुहेरी फटका बसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भाज्यांचे भाव दुप्पट वाढल्याचे दिसून येत आहे. भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य लोकांच्या किचनच्या बजेटवर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान (vegetables loss) झालं आहे. त्यामुळेच दर वाढत असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत भाज्यांचे वाढलेले दर असेच राहतील आणि नंतर कमी होती असे सांगितले जात आहे. वाशी एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची किंमत? मंगळवारी मुंबईतील वाशी येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याचे दिसून आले. कमी आवक झाल्यामुळे वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर लक्षणीय वाढले आहेत. त्यामुळे घाऊक बाजाराचे दरही वाढले आहेत. हे वाचा -  लोकप्रिय कलाकारानं सोन्याचे तांदूळ सोडले नदीत, एका संदेशासाठी केला लाखोंचा खर्च तर किरकोळ किंमती दोन ते तीन पटीनं वाढल्या आहेत. टोमॅटो आधी 20 रुपये किलो मिळत होता, आता तो 80 रुपये प्रति किलो मिळत आहे. 40 रुपये किलो मिळत असलेली गवारी आता 80 रुपये किलोने मिळत आहे. कांद्याची किंमत 30 ते 60 रुपयांपर्यंत मिळत आहे. तर पूर्वी कोथिंबीर 30 रुपयांना भाजीपाल्यासह मोफत दिली जात होती. पण आता ती 60 रुपये किलोने विकली जात आहे. वांगी 35 रुपये असायची पण आता ती 80 रुपये किलो आहे. शिमला मिरची पूर्वी 40 रुपये किलोने विकली जात होती आता ती 80 रुपये किलोने विकली जात आहे. हे वाचा -  26 तारखेला सोमय्या नांदेडला येणार आता करा बातमी मोठी, चंद्रकांत पाटलांचा आणखी एक दावा फक्त भाज्याच नाही सर्वच महाग - शेतकरी नेते वाढलेल्या भाजीपाल्यांच्या दराबाबत शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, मधल्या काळात ज्या प्रकारे भाज्यांचे दर घसरले होते. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांना 2 ते 3 महिने सतत भाजीपाला फेकून द्यावा लागला, संपूर्ण हंगाम खराब झाला. आता काहीशी दरात वाढ होत असेल तर आपण त्याचे स्वागत करायला हवे. आणि महत्त्वाचे म्हणजे वाढलेले हे दर इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाढलेले दिसून येत आहेत. त्याचा थेट शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या