JOIN US
मराठी बातम्या / मनी / Cabinet Meeting Decision : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार आणतंय नवीन खतं

Cabinet Meeting Decision : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार आणतंय नवीन खतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सल्फर कोटेड युरियाला मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.

जाहिरात

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : बळीराजाच्या हिताचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सल्फर कोटेड युरियाला मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. सल्फर  कोटेड युरियाला युरिया गोल्ड असे नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. सरकारने यापूर्वी नीम कोटेड युरिया देखील बाजारात आणलं आहे. सल्फर कोटेड युरिया कमी सल्फर असलेल्या जमिनीसाठी वरदान ठरू शकतं. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार सल्फर कोटेड युरियासाठी सरकार अतिरिक्त अनुदान देणार आहे. ते बनवणाऱ्या कंपन्यांनाही अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. नवी दिल्ली इथे पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. याअंतर्गत सेंद्रिय शेती करणाऱ्या राज्यांना सरकार अनुदान देणार आहे. खतांचा वापर कमी करणाऱ्या राज्यांना ५०% अनुदान परत मिळू शकते. राज्यांना नॅनो युरियाला प्रोत्साहन द्यावे लागेल. गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली होती. संमिश्र खते तयार करणाऱ्या वनस्पतींना प्रति टन १५०० रुपये अनुदान मिळेल असं सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या