शेंजेन व्हिसा
नवी दिल्ली, 6 एप्रिल: नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा पर्यटनासाठी परदेश प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवासापूर्वी संबंधित देशाच्या व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. युरोपात प्रवास करण्यासाठी मात्र सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये केवळ शेंजेन व्हिसाची आवश्यकता असते. तथापि, या व्हिसासाठीची अर्जप्रक्रिया दमछाक करणारी आहे. कारण कागदपत्रांची जमवाजमव, पडताळणी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वाणिज्य दूतावासात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनचे सदस्य देशांनी आता या प्रक्रियेच्या डिजिटायझेशनचा विचार केला आहे.
युरोपियन युनियनच्या कौन्सिलच्या प्रेस रिलीजनुसार, या प्रस्तावात सध्या वापरल्या जाणाऱ्या व्हिसा स्टिकर्सच्या जागी डिजिटल व्हर्जनचा समावेश असेल. ही संपूर्ण प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवणं, हे यामागचं मुख्य ध्येय असल्याचं कौन्सिलने अधोरेखित केलं आहे. स्वीडनच्या स्थलांतर मंत्री मारिया मालमर स्टेनेगार्ड यांनी त्यांच्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की, `ज्या वैध प्रवाशांना डिजिटल शेंजेन व्हिसा हवा आहे, त्यांच्यासाठी अर्जप्रक्रिया सोपी असेल. तसंच शेंजेन क्षेत्र अधिक सुरक्षित राहण्यास यामुळे मदत होईल. ऑनलाइन अर्जामुळे प्रवाशांना वाणिज्य दूतावासात वारंवार जावं लागणार नाही आणि राष्ट्रीय प्रशासनासाठी प्रक्रिया अधिक सुलभ होईल. डिजिटल व्हिसामुळे बनावट व्हिसा स्टिकरचा, तसंच व्हिसा स्टिकर चोरी होण्याचा धोका संपुष्टात येईल.`
Online gaming new rules : ऑनलाइन गेमिंगचे नियम बदलणार, आज होऊ शकते घोषणा; नवे नियम काय?1. ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेस : ही प्रक्रिया कोणत्याही ऑनलाइन अर्जप्रक्रियेसारखीच असेल. शेंजेन व्हिसासाठी अर्ज करण्याकरिता एकच प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट तयार करणं हे कौन्सिलचं उद्दिष्ट असून ते अधिकृत राष्ट्रीय प्रणालीकडे निर्देशित केलं जाईल. हा व्हिसा मिळवण्यासाठी प्रवासी सर्व आवश्यक कागदपत्रं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं अपलोड करू शकतील आणि शुल्कदेखील भरू शकतील. त्यानंतर त्यांना निर्णयाची माहिती डिजिटल पद्धतीने दिली जाईल. 2. मॅन्युअल रूटचा वापर कोणाला करावा लागेल? : या व्हिसासाठी जे पहिल्यांदाच अर्ज करत आहेत किंवा ज्यांची बायोमेट्रिक माहिती कालबाह्य झाली आहे, त्यांना वैयक्तिक उपस्थिती आवश्यक असेल. नवीन कागदपत्रं सबमिट करणाऱ्यांदेखील वाणिज्य दूतावासाला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल. 3.ऑटोमॅटिक सिस्टीम : ज्यांना अनेक देशांमधून प्रवास करायचा आहे, त्याची प्रक्रिया तपासण्याची जबाबदारी कोणत्या देशाकडे द्यायची हे वेबसाइट आपोआप ठरवेल. ही सिस्टीम प्रवाशाच्या मुक्कामाचा कालावधी निवडण्यामध्ये योगदान देईल. अर्जदारास विशिष्ट सदस्य देशात अर्जावर प्रक्रिया करायची असेल तर त्यांना देश निवडण्याचा पर्याय दिला जाईल. 4. 2D बारकोड : डिजिटल व्हिसा 2D बारकोड आणि क्रिप्टोग्राफिकल स्वाक्षरीसह जारी केला जाईल. यामुळे व्हिसा स्टिकर्स चोरीचा धोका कमी होईल.