JOIN US
मराठी बातम्या / मनी / सर्वसामान्यांना दिलासा! किरकोळ महागाईत घसरण, मार्चमध्ये महागाई 5.66 टक्क्यांवर

सर्वसामान्यांना दिलासा! किरकोळ महागाईत घसरण, मार्चमध्ये महागाई 5.66 टक्क्यांवर

Retail Inflation: देशातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई फेब्रुवारीमध्ये 6.4 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांवर आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय.

जाहिरात

किरकोळ महागाई दरात घसरण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Retail Inflation: देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढतेय. दुधापासून तर गॅसच्या वाढत्या किंमतींने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान आता महागाईच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मार्चमध्ये किरकोळ महागाईत घट झाली आहे. मार्च 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 5.66 टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच गेल्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिलाय. महागाईचा दर मुख्यत: स्वस्त खाद्यपदार्थांमुळे कमी झालाय. फेब्रुवारी 2023 मध्ये तो 6.44 टक्के होता. 12 एप्रिल रोजी सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.

यासोबतच महागाईचा दर आरबीआयच्या टॉलरेंस बँडच्या कक्षेत आला आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेत आहे. चलनविषयक धोरणाचा विचार करताना, RBI मुख्यत्वे किरकोळ महागाईकडे लक्ष देते. चलनवाढ 2 टक्क्यांच्या श्रेणीसह 4 टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवर सोपवण्यात आली आहे.

जगातील सर्वात लहान हवाई प्रवास! काही सेकंदांच्या प्रवासासाठी का वापरतात विमान?

कंझ्यूमरस प्राइस इंजेक्स(CPI) वर आधारित किरकोळ महागाई फेब्रुवारी 2023 मध्ये 6.44 टक्के आणि एका वर्षापूर्वी मार्चमध्ये 6.95 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO)नुसार मार्चमध्ये खाद्यपदार्थांची महागाई 4.79 टक्के होती. फेब्रुवारीमध्ये हा आकडा 5.95 टक्के आणि वर्षभरापूर्वी याच कालावधीत 7.68 टक्के होता. तृणधान्ये, दूध आणि फळांच्या किमती वाढल्या आहेत. यामुळेच किरकोळ महागाई डिसेंबर 2022 मध्ये 5.7 टक्क्यांवरून फेब्रुवारी 2023 मध्ये 6.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज होता.

ऊन पावसाचा सामना करुनही का गंजत नाहीत रेल्वे रुळ? कारण पाहून व्हाल चकीत

संबंधित बातम्या

गेल्या आठवड्यात RBI ने रेपो रेटमध्ये केला नाही बदल

नुकतंच आरबीआयने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसी बैठकीमध्ये रेपो रेट स्थिर ठेवण्याची घोषणा केली होती. आरबीआयने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंज्यूमर प्राइस इंजेक्स आधारित मुद्रास्फीतीच्या 5.2 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या