JOIN US
मराठी बातम्या / मनी / मोठी बातमी, फेसबुकनंतर आता Jio मध्ये Silver Lake करणार 5,655 कोटींची गुंतवणूक

मोठी बातमी, फेसबुकनंतर आता Jio मध्ये Silver Lake करणार 5,655 कोटींची गुंतवणूक

इक्विटी फर्म सिल्वर लेक (Equity Firm Silver Lake) ने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1.15 टक्के भागीदारी घेतली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मे : फेसबुकनं 43, 574 कोटींची Jio मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता इक्विटी फर्म सिल्वर लेक (Equity Firm Silver Lake) ने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1.15 टक्के भागीदारी घेतली आहे. जगभरातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक कंपनीने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी घेत 43,574 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. फेसबुकनं व्हॉट्सअॅप खरेदी केल्यानंतर सर्वात मोठी नेटवर्क म्हणून ओळखलं जात आहे. फेसबुक आणि जिओमध्ये झालेल्या या करारामुळे भारतात टेलिकॉम आणि डिजिटल मीडियासाठी तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मार्क झुकनबर्ग यांनी व्यक्त केला होता.

सिल्वर लेक फर्म ही टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेली फर्म आहे. जगभरात सुमारे 43 अरब डॉलर्सची संपत्ती असून जवळपास जवळपास 100 गुंतवणूकी आणि ऑपरेटिंग व्यावसायिकांची टीम आहे. याआधी, सिल्व्हर लेकने अलिबाबा ग्रूप, एअरबीएनबी, डेल, दीदी चकिंग, हायला मोबाइल, अँट फायनान्शियल, एल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटरमध्येही गुंतवणूक केली आहे. रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म हा जिओचा आहे. रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅफॉर्ममधील कंपनी आहे. याशिवाय माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन. एवढेच नव्हे तर रिलायन्स या कंपनी अंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील देते. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या