JOIN US
मराठी बातम्या / मनी / रिलायन्स समूह कर्जमुक्त! 58 दिवसात कमावले 168,818 कोटी; चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले- 'वचन केलं पूर्ण'

रिलायन्स समूह कर्जमुक्त! 58 दिवसात कमावले 168,818 कोटी; चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले- 'वचन केलं पूर्ण'

कंपनीने ही रक्कम राइट्स इश्यू आणि टेलिकॉम कंपनी असणारी रिलायन्स जिओ (Reliance Jio) मधील भागीदारीनं विकून कमावले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 जून : मार्केट कॅपच्या हिशोबानं देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स समूहानं (RIL-Reliance Industries) ने 58 दिवसांत एकूण 1 लाख 68 हजार 818 कोटी कमावले आहेत. कंपनीने ही रक्कम राइट्स इश्यू आणि टेलिकॉम कंपनी असणारी रिलायन्स जिओ (Reliance Jio) मधील भागीदारीनं विकून कमावले आहेत. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industru Chairman Mukesh Ambani) यांनी शुक्रवारी घोषणा करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, रिलायन्सनं जगभरातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकीदारांनी डिजीटल प्लॅटफॉर्म Jio Platform मध्ये केलेल्या गुंतवणूकीनंतर आणि शेअर विक्रीच्या माध्यमातून मार्च 2021च्या आधी कर्जमुक्त होण्याचे लक्ष पूर्ण केले आहे. रिलायन्स इंडस्ट्री झाली कर्जमुक्त! मुकेश अंबानी यावेळी असेही म्हणाले की, मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे. कारण शेअर होलडर्सना केलेलं वचन आम्ही पूर्ण केलं. आम्ही 31 मार्च 2021च्या आधी आमच्या निश्चित कार्यक्रमाआधी रिलायन्सला कर्जमुक्त केलं.

Reliance Industries कर्ज मुक्त झाली आहे. कंपनीने गेल्या 58 दिवसात 1,68,818 कोटी रुपये कमावले आहेत. रिलायन्सने राइट्स इश्यू मधून देखील 53,124.20 कोटी कमावले आहेत. यामुळे NET लेव्हल वर RELIANCE कोणतेही कर्ज नाही आहे .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या