पब्लिक प्रोव्हिडेंट फंड
मुंबई : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. दीर्घ काळासाठी यात गुंतवणूक करता येते. त्यामुळे त्यात मोठ्या रकमेची गुंतवणूक करता येते व त्यातून चांगले लाभही मिळतात, मात्र या योजनेचे जसे फायदे आहेत, तशा काही मर्यादाही आहेत. गुंतवणूक करण्याआधी त्याबाबत जाणून घेतलं पाहिजे. ‘मनी कंट्रोल’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. अनेक गुंतवणूकदार पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात. दीर्घ काळाच्या गुंतवणुकीसाठी याचा चांगला उपयोग होतो. मात्र पीपीएफमध्ये गुंतवणूक करून काही वेळेला पश्चात्तापही होऊ शकतो. त्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत.
PPF Rules: मॅच्युरिटीपूर्वीच PPF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय? पैसे क्लेम कसे करायचे?कमी व्याजदर ईपीएफच्या (एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड) तुलनेमध्ये पीपीएफमध्ये गुंतवणुकीवर कमी व्याजदर असतो. सध्या पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के व्याजदराचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. ईपीएफमध्ये मात्र 8.15 इतका व्याजदर मिळतो. त्याशिवाय व्हीपीएफ (व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड) योजनेतही पैसे गुंतवता येऊ शकतात. नोकरदार वर्गासाठी मात्र पीपीएफ योजना हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. दीर्घ ‘लॉक इन’ कालावधी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल पीपीएफ योजना उत्तम आहे. याचा ‘लॉक इन’ कालावधी 15 वर्षांचा आहे. मात्र कमी कालावधीसाठी गुंतवणूक योजना हवी असेल, तर पीपीएफ हा चांगला पर्याय ठरू शकत नाही. पैसे काढणं अवघड ही योजना दीर्घकाळाची असल्यानं त्यातून वेळेआधी पैसे हवे असल्यास अनेक अटींची पूर्तता करावी लागते. खातं उघडल्यानंतर 5 वर्षांनी तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकता. तसंच एका आर्थिक वर्षात एकदाच पैसे काढता येऊ शकतात.
PPF अकाउंट बंद झालंय तर नो टेंशन! एका झटक्यात करता येईल सुरु, ही आहे प्रोसेसगुंतवणूक रकमेची मर्यादा पीपीएएफमध्ये वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. गेल्या काही वर्षांपासून सरकारनं ही मर्यादा वाढवली नाहीये. त्यामुळे ज्या नोकरदार व्यक्तींना जास्त रकमेची गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी व्हीपीएफ ही चांगली योजना आहे. त्यात कोणत्याही जादा कराशिवाय पगारातील 2.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. वेळेआधी बंद करता येत नाही पीपीएफ खातं वेळेआधी बंद करता येत नाही. खातं उघडल्यावर 5 वर्षांनी काही अटींची पूर्तता केल्यावर तसं करणं शक्य होऊ शकतं. मात्र त्याचे नियम खूप कडक आहेत. खातेधारक, त्यांचा जोडीदार किंवा अपत्य यांना जीवघेणा आजार असेल, खातेधारक किंवा मुलांचं उच्च शिक्षण किंवा परदेशात जायचं असेल, तरच हे खातं बंद करता येतं. अर्थात वेळेआधी खातं बंद केल्यास एक टक्क्यापर्यंतच्या व्याजाचीरक्कम कापली जाऊ शकते. कोणतीही गुंतवणूक योजना परिपूर्ण नसते. म्हणूनच गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुसार योग्य त्या योजनेत गुंतवणूक करू शकतात. त्या दृष्टीनं पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्यातून मिळणारे लाभ, त्याच्या मर्यादा जाणून घेणं गरजेचं आहे.