पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू केली तर बँकांपेक्षा जास्त व्याज मिळतं. विशेष म्हणजे तुम्ही इथे फक्त १० रुपयांपासूनही आरडी सुरू करू शकता.
पोस्ट ऑफिसचं रिकरिंग डिपॉझिट गुंतवणूकीचा एक फायदेशीर पर्याय आहे. आरडीमुळे तुम्हाला नियमित मिळकत मिळत राहते. आरडीमुळे बचत करण्याची सवयही आपल्या हाताला लागते. प्रत्येक महिन्यात सेव्हिंग होत राहतं. त्यामुळे ठराविक रक्कम बचत करण्याचं लक्ष्य सहजपणे पूर्ण करू शकतो.
पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू केली तर बँकांपेक्षा जास्त व्याज मिळतं. विशेष म्हणजे तुम्ही इथे फक्त १० रुपयांपासूनही आरडी सुरू करू शकता.
बँकेपेक्षा जास्त व्याज- पोस्ट ऑफिसच्या आरडीवर बँकांपेक्षा थोडं जास्त व्याज मिळतं. सध्या आरडीवर पोस्ट ऑफिसमध्ये ७.३ टक्के व्याज मिळतं. तर बँकांमध्ये आरडीवर सध्या सर्वसाधारणपणे ६.८५ टक्के व्याज मिळत आहे.
५ वर्षात १ हजार रुपयांचे मिळतील ७० हजार २०० रुपये-आरडीवर तुम्हाला कम्पाऊंड इंटरेस्ट मिळतो. म्हणजे प्रत्येक वर्षागणिक तुम्हाला व्याजात मिळणारी रक्कम मूळ रक्कम बनत जाणार. इंडिया पोस्ट वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही महिन्याला १० रुपये गुंतवत आहात. तर ५ वर्षांनंतर ही रक्कम ७२५.०५ रुपये होईल. म्हणजे जर तुम्ह १ हजार रुपये दर महिन्याला गुंतवले तर मॅच्युरिटीवेळी ही रक्कम साधारणपणे ७२, ५९० रपये होईल.
कसं उघडाल अकाऊंट- पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू करणं खूप सोपं आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आरडी सुरू करू शकता. तुम्ही एक किंवा त्याहून जास्त आरडी अकाऊंट सुरू करू शकता. १० किंवा त्याहून जास्त वयाची कोणत्याही व्यक्तीचे आरडी अकाऊंट उघडता येऊ शकते. तसेच या आरडीची खासियत म्हणजे तुम्ही आरडीचे जॉईंट अकाऊंटही सुरू करू शकता.
पोस्ट ऑफिसच्या आरडीचेही काही नियम आहेत- जर तुम्ही महिन्याच्या १ तारखेपासून ते १५ तारखेपर्यंत आरडी अकाऊंट सुरू केलं असेल तर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत तुम्हाला ठरलेली रक्कम भरावी लागणार. तसेच १६ तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जर तुम्ही अकाऊंट सुरू केलं असेल तर तुम्हाला या १५ दिवसांमध्ये दर महिन्याला ठरलेली गुंतवणूकीची रक्कम भरावी लागणार.