JOIN US
मराठी बातम्या / मनी / Post Office Scheme: दररोज 50 रुपयांची बचत करा आणि मिळवा 35 लाख, पैसै बुडण्याची चिंताही नाही

Post Office Scheme: दररोज 50 रुपयांची बचत करा आणि मिळवा 35 लाख, पैसै बुडण्याची चिंताही नाही

Post Office Gram Suraksha Yojana: या योजनेत तुम्ही दररोज 50 रुपये जमा केले तर तुम्हाला 35 लाख रुपये मिळतील. जर एखाद्या व्यक्तीने 19व्या वर्षापासून दर महिन्याला पॉलिसीमध्ये 1515 रुपये जमा केले तर ही 10 लाख रुपयांची पॉलिसी असेल तर त्याला मॅच्युरिटीवर 34.60 लाख रुपये मिळतील.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी आजपासून गुंतवणूक करणे गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र लोकांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे जास्त असतो. म्हणजेच अनेकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीप्रमाणे जोखीम नको असते कारण त्यांना त्यातलं फारसं काही कळतंही नसतं. अशांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना देखील फायदेशीर ठरु शकतात. पोस्ट ऑफिस बचत योजना भारताच्या ग्रामीण भागात बचतीचे एक चांगले साधन आहे. देशातील कमी विकसित भागातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पोस्ट ऑफिसच्या रूरल पोस्टल लाइफ इंश्योरेंस स्कीम्स प्रोग्राम अंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राम सुरक्षा योजनेचाही समावेश आहे. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही एक जीवन विमा पॉलिसी आहे, ज्यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाल्यावर एंडोमेंट अॅश्युरन्स पॉलिसीमध्ये रूपांतरित करण्याचे वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे. यामध्ये पॉलिसीधारक 55, 58 किंवा 60 वर्षे वयापर्यंत प्रीमियम भरून जास्तीत जास्त लाभ मिळवू शकतो. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ग्राहकांचं खर्चाचं बजेट बिघडणार? बँकेने व्याजदर वाढवल्याने EMI वाढणार योजनेची खास वैशिष्ट्ये? 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये, किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे, तर कमाल 10 लाख रुपये आहे. यामध्ये प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्यायही दिले आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ते भरू शकतात. RupeeVsDollar: डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण; पडझडीचा तुमच्यावर काय परिणाम होईल? पॉलिसीधारकाला चार वर्षांनंतर कर्ज सुविधा उपलब्ध होते. तर तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारक पॉलिसी सरेंडर करू शकतो. 5 वर्षापूर्वी सरेंडर केल्यास योजनेत बोनस मिळणार नाही. या योजनेत तुम्ही दररोज 50 रुपये जमा केले तर तुम्हाला 35 लाख रुपये मिळतील. जर एखाद्या व्यक्तीने 19व्या वर्षापासून दर महिन्याला पॉलिसीमध्ये 1515 रुपये जमा केले तर ही 10 लाख रुपयांची पॉलिसी असेल तर त्याला मॅच्युरिटीवर 34.60 लाख रुपये मिळतील. गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 31,60,000 रुपये, 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 33,40,000 रुपये आणि 60 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 34.60 लाख रुपये मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या